अंजना - पळशी मध्यम प्रकल्पाकडे पाण्याचा प्रवाह सुरू

Foto
तपोवन लघु प्रकल्प तुडुंब

कन्नड, (प्रतिनिधी): परिसरात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कन्नड तालुक्यातील तपोवन येथील लघु सिंचन प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरून तुडुंब वाहू लागला आहे. 

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्तपाण्याचाप्रवाह आता अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाकडे सुरू झाला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. 

अखेर आज सकाळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाणी वाहू लागले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी खरीप हंगामासाठी पाण्याची मोठी उपलब्धता होणार आहे. तपोवन लघु प्रकल्पातून अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाकडे पाणी जाऊ लागल्याने पिशोर परिसरातील अंजना-पळशी मध्यम प्रकल्पही लवकरच भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेलाही मोठा दिलासा मिळणार आहे. संततधार पावसामुळे प्रकल्प परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले असून सांडव्यातून वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी होत आहे. मात्र, प्रशासनाने धरण व सांडवा परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.